Skip to content Skip to footer

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताच, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांचे ट्विट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पातील काही तरतुदी आणि मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी सूचक ट्विट केले आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज सादर होत असलेल्या अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे.

देश आर्थिक संकटातून जात असताना लोकांनी नोकऱ्या गमावल्या असताना रेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या अन्नधान्याची किंमत वाढवण्याची सूचना आर्थिक सर्वेक्षणात केली असली तरी ते वाढू नयेत. तसंच केंद्र सरकार व अर्थमंत्र्यांची अधिकृत भूमिका काय, हे स्पष्ट व्हायला हवं, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

तसेच, सीएमआयइच्या अहवालानुसार डिसेंबर महिन्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं असून ते ९.१ % पेक्षा अधिक आहे. मात्र आर्थिक सर्वेक्षणात बेरोजगारीबद्दल कोणतीही स्पष्टता आढळत नाही. त्यामुळे बजेट मांडताना बेरोजगारीचा गांभीर्याने विचार करुन त्यासाठी ठोस योजना आणण्याची गरज आहे, असं मत रोहित पवारांनी व्यक्त केले आहे.

Leave a comment

0.0/5