Skip to content Skip to footer

निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला ‘अर्थसंकल्प’ म्हणजे भाजपाच्या निवडणुकीचा जाहीरनामा – यशोमती ठाकूर

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावर काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाष्य करत टोला लगावला आहे. ‘निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या निवडणूकीचा जाहीरनामा आहे, असा घणाघाती टीका महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. ठाकूर यांनी ट्विटद्वारे या अर्थसंकल्पाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा आहे. ज्या राज्यात निवडणुका तिथे मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज द्यायचं. तसेच मुंबईतून सर्वाधिक सरकारला सर्वाधिक कर मिळतो. अनेकारांना रोजगाराची संधी आणि स्थैर्य मुंबई आणि महाराष्ट्रात प्राप्त होते. मात्र यानंतरही केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईच्या वाट्याला काहीच आलेले नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा आहे, असंही ठाकूर यांनी नमूद केले आहे.

Leave a comment

0.0/5