Skip to content Skip to footer

परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे असे सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘कुलाबा कन्व्हर्सेशन’ या परिषदेत ऑनलाईन उदघाटनावेळी भाषण करताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाने सगळ्या जगाचे पॉझचे बटन दाबले असले तरी आपल्याला पुढील वाटचाल कशी करावी लागणार आहे तेही शिकविले आहे. कोरोनाने आपल्याला पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ते शिकविले आहे. विकास सगळ्यांना हवा आहे पण कोरोना काळात आपल्याला विकासाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली आहे.

त्या मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस, मेट्रो, त्याचप्रमाणे मुंबईच्या मधोमध ८०० एकर आरेचा भूभाग वनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय याविषयी यावेळी माहिती देण्यात आली. कोरोनावर निश्चित औषध नसले तरी केवळ ऑक्सिजन देऊन अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे पुढील काळात ऑक्सिजनचे किती महत्त्व असणार आहे आणि पर्यावरणाची आपल्याला किती काळजी घ्यावी लागणार आहे ते समजले असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5