Skip to content Skip to footer

“उद्धव ठाकरे यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम” – उदय सामंत.

“इंधन दरवाढ करून मागच्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘अच्छे दिन’ दाखविले आहेत.” अशा खोचक शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. आज इंधन दरवाढ विरोधात शिवसेना संपूर्ण राज्यभरात केंद्र सरकार विरोधात निदर्शने करणार आहे.

आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी भाजपने ‘आम्ही सत्तेत आल्यावर अच्छे दिन आयेगे, आम्ही पेट्रेलचे दर कमी करू, आम्ही गॅसचे दर कमी करू.’ असे आश्वासन सामान्य नागरिकांना देऊन केंद्रात भाजपने सत्ता आणली होती.

मात्र त्याच्यानंतर या सात-आठ वर्षात किती अच्छे दिन आलेत हे आम्हा-तुम्हाला माहीतच आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढणे याचा सरळ सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होतो. म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे केंद्राकडे आपली भूमिका मांडली होती की, ‘पेट्रोल-डिझेलचे दर कायम कमी असले पाहिजे’ म्हणून आज महाराष्ट्रभर शिवसेना पेट्रोल दरवाढ केंद्राच्या विरोधात आंदोलन करणार आहे.” असे त्यांनी संगितले.

Leave a comment

0.0/5