Skip to content Skip to footer

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, केरळहून आलेल्या प्रत्येक प्रवाशांची होणार आरटी-पीसीआर कोरोना टेस्ट

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी राज्य सरकार खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना राबवताना दिसत आहे. त्यात आता ठाकरे सरकारने कोरोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून केरळ राज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठाकरे सरकारने केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. कोरोनारुग्ण शोधण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. यापूर्वी गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक केली होती आता त्या पाठोपाठ केरळ मधून येणाऱ्या नागरिकांना टेस्ट बंधनकारक केली आहे.

केरळमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. केरळमधून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी सरकारचा आदेश बंधनकारक आहे.

Leave a comment

0.0/5