Skip to content Skip to footer

“पवार साहेब उद्या जेजुरीला येत आहेत, हिंमत असेल तर आडवा.” – डॉ जितेंद्र आव्हाड.

जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते अनावरण होणार आहे. या सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे, तसेच अहिल्याबाई होळकर यांचे वंशज यशवंतराव होळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान शरद पवारांच्याहस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली. आता या टीकेला मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

“पवार साहेब उद्या जेजुरीला येत आहेत, हिंमत असेल तर आडवे येऊन दाखवा.” असं थेट आवाहन पडळकर यांना दिले आहे. “शरद पवारांवर टीका केली की हेडलाइन होते, हे महाराष्ट्र गेल्या ४० वर्षांपासून पाहतो आहे

. पडळकरांनाही ही कला उमजली आहे. पडळकरांनी एखाद्या चोरासारखं पहाटेच्या अंधारात अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यांच्यात हिंमत होती तर दुपारी अनावरण करायचे. सांगून करायचे. उद्या साहेब तिथं येणार आहेत, हिंमत असेल तर अडवून दाखवा.” असा थेट इशारा गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

Leave a comment

0.0/5