Skip to content Skip to footer

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे’ पुन्हा काँग्रेसचा भाजपाला टोला.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची शिवजयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन ठाकरे सरकारने केले आहे. यावरून भारतीय जनता पक्षाने या निर्णयाला विरोध दर्शवून आघाडी सरकारवर टीका केली आहे. आता या टीकेला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणतात की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांबरोबर करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी मोदींचा वाढदिवस साजरा करावा. कोरोनाचा संकटकाळ आहे हे विसरता कामा नये.” असा टोला लगावला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विटरवर ट्विट करत भाजपाला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. “शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या हृदयात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली असती तीच महाविकास आघाडी सरकार घेत आहे. शिवरायांचा राजधर्म हाच होता. दाढी वाढवून स्वतःची शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही.” असा टोला सावंत यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

Leave a comment

0.0/5