Skip to content Skip to footer

“संजय राठोड यांची ती ऑडिओ क्लिप बनावट.” शिवसेना नेते राजेंद्र गायकवाड यांचा दावा.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा.” अशी मागणी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. यावर आता मुख्यमत्र्यांनी जातीने लक्ष घातले आहे. मात्र शिवसेनेचे वरिष्ठ नेते राजेंद्र गायकवाड यांनी राठोड यांची पाठराखण केली आहे.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी एक व्हीडिओ ट्विट करत संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गृहमंत्र्याकडे केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीही करावी, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. मात्र, राजेंद्र गायकवाड यांनी वाघ यांना फटकारले आहे. “चित्रा वाघ कोण आहेत?” असा सवाल राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थित केला होता.

“सध्या शिवसेना नेते आणि मंत्री राठोड हे विदर्भात शिवसेनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात करत आहे. तेच काम आता भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात खुपसत आहे. म्हणूनच राठोड यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजप आखताना दिसत आहे.” असा आरोप गायकवाड यांनी केला होता.

Leave a comment

0.0/5