Skip to content Skip to footer

“संजय राठोडांना संपवण्याचे भाजपचे कटकारस्थान.” असा आरोप करत भाजप नेत्याचा राजीनामा.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आल्यानंतर भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यात मंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिला होता.

राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपमध्ये असलेल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी स्वपक्षावर आरोप लगावत आपला पदाचा राजीनामा देत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कमला नवनात चव्हाण यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.

“लोकनेते मुंडे साहेबांच्या निधनानंतर भाजप पक्षामधील नेते मंडळी हे वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व आणि बंजारा समाजातील उच्च पदस्थ नेते संजय राठोड यांना संपविण्याचे कटकारस्थान करत असल्याचे जाणवत आहे.” असा गंभीर आरोप कमला चव्हाण यांनी भाजपवर करत आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.

 

Leave a comment

0.0/5