राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे.
I have tested COVID positive.
Whilst I am doing fine, I am taking appropriate medical advice and hope to recover soon. I shall be undertaking my duties via video-conference.
I request those who have come in contact with me recently to be observant and self-isolate.🙏
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 18, 2021
“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे.” अशी पोस्ट त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलेली आहे.
मंत्री जयंत पाटील यांच्या आधी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. दोनच दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना डिस्चार्ज मिळाला होता.