Skip to content Skip to footer

नगर मध्ये फुलले कमळ, घड्याळ्याचे वाजले बारा…..

दक्षिण लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी बाजी मारली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांचा सुमारे पावणेतीन लाखांच्या फरकाने पराभव केला आहे. विखे यांच्या निर्णायक मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व दावे फोल ठरले असून ही लढत प्रतिष्ठेची करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या पराभवामुळे धक्का बसला आहे. विखे यांना ६ लाख ९५ हजार ६७४ इतकी मते पडली, तर राष्ट्रवादीचे जगताप यांना ४ लाख १८ हजार ८९६ मते पडली. भाजपचे विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी हा विजय आपण आपले आजोबा बाळासाहेब विखे यांना अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विखे यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर प्रंचड जल्लोष करीत गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. यावेळी विखे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. आपल्या विरूद्ध सर्व विरोधक द्वेषभावनेने एकत्र आले, परंतु मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असे सांगून विखे यांनी आम्ही शिर्डी मतदार संघातील शिवसेनेची जागी अवघ्या तीन दिवसात निवडूण आणून दखविल्याचे सांगितले. “माझे लाड पुरवायला मला आजोबांची गरज लागत नाही” असे बोलून नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना चिमटा काढला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईल, अशी पैज लावली होती. परंतु राज्यातील कल पाहता मी राज्यातील पहिल्या तीन सर्वाधिक मताधिक्य असलेल्या उमेदवारांमध्ये असेल, असे मला वाटते. मुख्यमंत्र्यांचा ४२ जागा युतीच्या येतील हा दावा खरा ठरतोय असे सुद्धा खासदार सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5