Skip to content Skip to footer

‘अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखता येईल अशी भाषा मी शिकणार आहे’ – उद्धव ठाकरे

 

किल्ले शिवनेरीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात, पण साधेपणाने साजरा करण्यात आला या सोहळयाला निवडक शिवप्रेमींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यात ‘इंगित विद्याशास्त्र’ ही एक भाषा होती. या भाषेमुळं एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे ओळखता येते. आता ती भाषा मी शिकणार आहे. अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी मी ही भाषा शिकणार आहे” असे म्हणत मुख्यत्र्यांनी टोला लगावला आहे.

“शिवरायांपुढं नतमस्तक व्हायला शिवजयंतीच हवी असे नाही. त्यांचे स्थान आपल्या मनात, हृदयात आहे. कुठल्याही कामासाठी निघताना नकळत त्यांचे स्मरण होतंय. कारण ते आपल्या धमन्यांमध्ये आणि रक्तामध्ये आहहेत” असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले.

Leave a comment

0.0/5