Skip to content Skip to footer

गेलात तिकडे सुखात राहा, इकडं माती करायला येऊ नका, सुळे यांचा गणेश नाईकांना टोला

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मागील काही वर्षात राष्ट्र्वादीला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्या म्हणाल्या की, आधी कोण पक्ष सोडून जातोय याची काळजी होती. मात्र, हे लोक तिकडं गेली ते बरं झालं असं वाटतंय. गेलात तिकडे सुखात राहा, इकडं माती करायला येऊ नका, असे वक्तव्य करत नाव न घेता गणेश नाईकांना टोला लगावला होता.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “काही भाजपाच्या लोकांच्या मनातही तसंच सुरु आहे. त्यांनाही भाजपाची सत्ता गेल्याने बरं वाटतंय. हे सर्व इनकमिंग सुरु केल्यामुळं झालं आणि त्या इनकमिंगमुळेच आमच्या पक्षाची सगळी माती झाली असंच ते म्हणत आहेत.”

तसेच त्या म्हणाल्या की, “काही लोकांमध्ये असे काही गुण असतात, ते कुठेही गेले तरी ते तसंच होतं. त्यामुळे मला तर बरं वाटतंय की बरीच लोकं तिकडं गेली. माझं म्हणणं आहे आता गेलाय ना तर तिथेच सुखात राहा, परत माती करायला इकडे येऊ नका” असा टोला त्यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना लगावला आहे.

Leave a comment

0.0/5