Skip to content Skip to footer

मुंबईत २४ तासात ९४ इमारती सील कोरोनाचा धोका वाढला

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा मुंबई मनपाची डोकेदुखी वाढली आहे. त्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई मनपाने कोरोना संदर्भातील नियम अधिक कठोर केले आहेत.

राज्यात शुक्रवारी कोरोनाचे ६ हजार ११२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या डिसेंबरनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवशी झालेली ही सर्वात मोठी लक्षणीय वाढ आहे. तर दिवसभरात ४४ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईतील ५१६२ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे पाच बाधित रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. इमारत सील केल्यानंतरही काही रहिवासी घराबाहेर जात असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील तब्बल ९४ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Leave a comment

0.0/5