Skip to content Skip to footer

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत प्रतिनिधीचा गौरव

मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयातील प्रतिनिधींनी मागील काही दिवसांत समाज माध्यमांद्वारे विविध उपक्रम राबविले. यामध्ये विकिपीडीयाच्या माध्यमातून मराठी भाषेतून आरोग्यविषयी माहिती प्रसारित केली आहे.

तसेच यासोबत विविध विषयांवर चित्रफीती तयार करून समाज माध्यमांद्वारे प्रदर्शित केल्या आहेत. हे करताना मराठी चित्रपटातील लोकप्रिय संवाद स्वत: बोलून त्याची संक्षिप्त चित्रफीत तयार केली. याच कार्यासाठी मुंबईतील अमेरिकन राजदूत जे. रँझ, प्रवक्ते नीक नोव्हाक, वरिष्ठ अधिकारी रोना राठोड यांचा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मराठी भाषेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार, प्रसार करण्यासाठी महावाणिज्यदूतमधील प्रतिनिधी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. दरम्यान, यापुढे अमेरिकेतील मराठी मुलांना महाराष्ट्रातून ऑनलाईन मराठीचे धडे देण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.

विविधतेत एकता व एकतेतून विविधता हा मुंबई व न्यूयॉर्क या शहरांना जोडणारा दुवा असून ही विविधता आपले सामाजिक जीवन संपन्न करेल आणि विविध संधी निर्माण करेल, असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला होता.

Leave a comment

0.0/5