Skip to content Skip to footer

मंत्री संजय राठोड कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्रकाश झोतात आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड आज होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी हजर राहिले आहेत आहे. आज दुपारी ते नागपूरहून आपल्या पत्नीसह मुंबईत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

काल त्यांनी पोहरादेवीच्या दर्शनासाठी सहकुटुंब गडावर हजेरी लावली होती. यावेळी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केले होते. मात्र विरोधकांकडून लावण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी नाकारले होते. लवकरच सत्य बाहेर येईल असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

संजय राठोड हे सकाळी यवतमाळहून नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. सकाळी सव्वा अकरा वाजताच्या विमानाने ते मुंबईला आले. यावेळी त्यांची पत्नी शीतल राठोड सोबत होती . “माझं सुरळीत काम सुरु झालं आहे. माझ्या शासकीय कामांना सुरुवात करतोय. मंत्रिमंडळ बैठकीला मी रवाना होत आहे अशी माहिती राठोडांनी निवासस्थानाहून निघताना दिली.

Leave a comment

0.0/5