Skip to content Skip to footer

शिवसेना महिला आघाडीच्या दणक्याने सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याला अटक

मुद्रा लोन मिळवून देते असे खोटे सांगून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या महिला काँग्रेस पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिला आघाडीने चांगला चोप दिला आहे. शमीम बानो असे त्या महिला काँग्रेस पदाधिकाऱ्याचे नाव असून मुद्रा लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने तिने अनेकांना फसविले होते.

याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत शमीम बानो हिला अटक केली आहे. बानो हिला न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्या महिलांना या महिलेने फसविले आहे त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार करावी असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

प्रकरण असे की, कल्याण पश्चिमेतील तहसील कार्यालयासमोर स्टॅम्प वेंडरची काम करणारी काँग्रेसची पदाधिकारी शमीम बानो हिला शिवसेनेच्या महिला आघाडीने मंगळवारी संध्याकाळी चोप देत महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले होते.

शमीम बानो हिने आधी नॅशनल बचत गटाच्या नावाने फी घेतली. त्यानंतर मुद्रा लोन मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक महिलांकडून लाखो रुपये उकळले. पैसे परत न मिळाल्याने महिलांनी शिवसेनेच्या नेत्यांना संपर्क साधला त्यानंतर बानो हिला शिवसेना स्टाईलने चोप देण्यात आला.

Leave a comment

0.0/5