Skip to content Skip to footer

४० लाख ट्रॅक्टरसह शेतकरी दिल्लीच्या संसद भवनाला घेराव घालणार

केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. त्यात आता हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकरी आंदोलकांनी ठिकठिकाणी किसान महापंचायतीचे आयोजन करत संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी “दिल्ली कान खोलकर सुन ले, पुढचा मोर्चा संसदेवर असेल. ४ लाख नव्हे तर ४० लाख ट्रॅक्टरसह संसदेला घेराव घालू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन येत्या काही दिवसात आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राकेश टिकैत हे महापंचायतींचे आयोजन करून ते विविध राज्यातील शेतकरी राजकारणाचा आढावा घेत आहेत. टिकैत यांनी मंगळवारी राजस्थानच्या सीकर येथे आयोजित शेतकरी महापंचायतीला हजेरी लावली. या महापंचायतीलाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. टिकैत यांनी यावेळी ही घोषणा केली होती.

Leave a comment

0.0/5