Skip to content Skip to footer

मोठी बातमी : कोरोनाची लस घेण्यासाठी शरद पवार मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल

सध्या संपूर्ण देशात जोरदार लसीकरण सुरु झालेले आहे. सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे सुद्धा आज कोरोनाची लस घेण्यसाठी जे जे रुग्णालयात दाखल झाले आहेत.

आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती. आता त्या पाठोपाठ शरद पवार यांनी सुद्धा कोरोनाची लस टोचून घेतली आहे. मागच्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींना सुद्धा कोरोनाची लस टोचण्यात यावी अशी मागणी होती. यावर सुद्धा लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5