Skip to content Skip to footer

चक्क २ कोरोना पॉझिटिव्ह फिरत होते मुंबईच्या रस्त्यावर, पालिकेने उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई : राज्यात विशेष करून मुंबईत कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढल आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मुंबई मनपाने कोरोना संदर्भातील नियम अधिक कडक केले आहे. त्यातच कोरोनाची नियम अधिक काटेकोरपणे पाळले जावेत म्हणून कायद्याचा धाक सुद्धा मनपाकडून दाखवला जात आहे.

परंतु तरीही कायद्याची भीती दाखवून मुंबई मनपाच्या नियमांकडे डोळेझाक करताना अनेक नागरिक दिसून आले आहेत. अशाच बेफिकिरीपणे वागणाऱ्या मुंबईकरांना अद्दल घडवण्यासाठी मुंबई महापालिकेने कारवाई करायला सुरुवात केली आहे.

मुंबईतील चेंबूर परिसरात सोमवारी दोन जणांवर FIR दाखल करण्यात आला. कारण हे दोन्ही व्यक्तींना कोरोना झालेला असून त्यांना गृह विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र हे दोघेही इतरत्र भटकताना आढळून आलेत. शिवाय या दोन्ही इसमांनी हातावर होम क्वारन्टाइनचा शिक्का मारून घेण्यासही मनाई केली होती.

त्याचमुळे मुंबई महापालिकेने अशा लोकांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चेंबूर विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने वॉर्डातील आरोग्य अधिकाऱ्यांनी या दोन्ही व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Leave a comment

0.0/5