मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा सामाजिक विषयावरील सिनेमा ‘ टॉयलेट एक प्रेम कथा ’ला पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग मिळाली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अवश्य वाचा – अर्जुन रामपालच्या ‘डॅडी’ मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे.
शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यादिनाच्या सुट्टीमुळे हा सिनेमा आणखी कमाई करणार आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा अक्षय कुमारचा हा या वर्षातील दुसरा सिनेमा ठरला.
यापूर्वी अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी 2 ने पहिल्या दिवशी 13.20 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाने हा आकडा गाठला नाही. या सिनेमाला समीक्षकांकडूनही दाद देण्यात आली आहे.
टॉयलेट एक प्रेम कथा हा सामाजिक विषयावरील सिनेमा आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.