Skip to content Skip to footer

संजूबाबा ‘या’ चित्रपटाद्वारे करणार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

गेल्या दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार यांची नावे या अभिनेत्यांच्या यादीत असून आता आणखीन एक नाव या यादीत सामील होणार आहे. संजूबाबा ने स्वतःचे संजय दत्त प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. तो या निर्मिती संस्थेतून पहिली मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. खुद्द त्यानेच सोशल मीडियावर याबाबतची घोषणा केली आहे.

https://www.instagram.com/p/BpjL2-xhLjT/?utm_source=ig_web_options_share_sheet

चित्रपटातील एका दृश्याचा फोटो संजय दत्तने इंस्टाग्रामवर क्लॅप बोर्डचा फोटो शेअर करून शेअर केला आहे. या फोटोत एका बालकलाकारासोबत अभिनेत्री नंदिता धुरी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता दीपक डोबरियाल दिसतो आहे. या फोटोंसह संजय दत्तने लिहिले की, संजय दत्त प्रोडक्शन अंतर्गत पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे, हे सांगताना खूप आनंद होत आहे. अद्याप चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही. ब्लूमस्टांग क्रिएशन्स सहनिर्मिती करीत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राज गुप्ता करणार आहेत. यात दीपक डोबरियाल, नंदिता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्रांजन गिरी व आर्यन मेघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a comment

0.0/5