Skip to content Skip to footer

छत्तीसगड मध्ये काँग्रेससाठी मत मागत आहेत मोदी!

बिलासपुर – पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्तीसगड विधानसभा निवडणुकांत काँग्रेससाठी मत मागताना पाहून लोक काही काळासाठी चकीत झाले होते. काँग्रेसचे प्रचारक म्हणून नरेंद्र मोदींशी साम्य असणारे व त्यांच्याच सारखी वेशभुषा करणारे अभिनंदन पाठक हे काम पाहत आहेत. दरम्यान, भाजप सरकारवर निशाणा साधत पाठक यांनी काँग्रेसलाच मतदान करण्याचे आव्हान केले आहे.

मन की बात मोदी करतात. पण, दुसऱ्यांचे काहीच ऐकून घेत नसल्यामुळेच उत्तरप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांना भेटल्यानंतर आपण काँग्रेससाठी प्रचार करण्याचे ठरवले आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी आपल्याला देण्यात आली असून त्याचसाठी आपण येथे आल्याचे पाठक यावेळी म्हणाले.

अभिनंदन यांच्या मते, त्यांच्या आयुष्यात २०१४मध्ये एक अमुलाग्र बदल घडून आला. पंतप्रधान मोदीं सारखेच आपण दिसत असल्याचे लोक आपल्याला म्हणत. आपण त्यानंतर वाराणसीला जाऊन मोदींसाठी प्रचार केला. त्यांनी प्रचारादरम्यान माझी गळा भेट घेतली. पण ते पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला एकदाही भेटले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मोदींवर नाराज होऊन आपण काँग्रेससाठी प्रचार सुरू केल्याचे पाठक म्हणाले.

Leave a comment

0.0/5