Skip to content Skip to footer

कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारीला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक

कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारीला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक

कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या निगरानीखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. या संदर्भात माहिती देताना वानखडे म्हणाले की, कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारीकडे ४०० ग्रॅम मेफेड्रॉन स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे.

या प्रकरणी अधिक तपास करताना त्यांना सईद शेख नावाच्या एका ड्रग सप्लायरची माहिती मिळाली. २५ वर्षीय सईद शेख मीरारोड परिसरातून आपला ड्रग्जचा व्यापार करतो अशीही माहिती एनसीबीला मिळाली होती. त्याचा माग घेताना एनसीबीने मीरा रोड परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकला असताना त्या ठिकाणी कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारी रंगेहाथ सापडली होती.

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण प्रकाश झोतात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत एनसीबीने त्या संबंधी अनेकांना अटक केली आहे. याच प्रकरणात सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावालाही अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी या दोघांनाही जामीन मिळाला होता.

Leave a comment

0.0/5