तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे मलायका ट्रोल झाली आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मलायकाचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. यात मलायकाचे पोटावरील स्ट्रेच मार्क्स दिसत आहे.त्यामुळे मलायका ट्रोल झाली आहे.
https://www.instagram.com/p/CKdV6fxHSjL/?utm_source=ig_web_copy_link
एक नेटकरी म्हणाला, “पोटामुळे तुझे वय दिसत आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “आता तू वयस्कर दिसते. ती आता म्हातारी होत आहे.” “हे स्ट्रेच मार्क्स या आधी कधी दिसले नाही. आज पहिल्यांदा दिसत आहेत” असं एक नेटकरी म्हणाला आहे.
मलायकाला नेटकरी ट्रोल करत असताना काही चाहत्यांनी ट्रोर्ल्सलाच सुनावले आहे. “जे लोक जेनिफर लोपेजची वाहवाह करतात तेच मलायकाला तिच्या वयावरून ट्रोल करत आहेत. ती वयाच्या ४०व्या वर्षीही सुंदर दिसत आहे. दुसऱ्यांना काही बोलण्या आधी स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष द्या” असे एका चाहत्याने म्हटले आहे. तर दुसरा चाहता म्हणाला की “मलायका अप्रतिम दिसते.”