Skip to content Skip to footer

शिवचरित्रातील सर्वात महत्वाची मोहीम – दक्षिण दिग्विजय मोहीम

शिवचरित्रातील सर्वात महत्वाची मोहीम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली दक्षिण दिग्विजय मोहीम. दक्षिण दिग्विजय मोहिमेला निघण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीतील वकीलामार्फत कुतुबशाह बरोबर बोलणी केली.

कुतुबशाहीचा कारभार मदाण्णा आणि अक्काण्णा या प्रधानांच्या हातात होता.

त्यांनी कुतुबशाहशी बोलून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मैत्री करण्यात त्याचा फायदा आहे हे पटवून दिले.

तसेच दक्षिणेकडे निघण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांच्या आघाडीवर शांतता आवश्यक होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निराजीपंतला बहादुरखानकडे धाडले.

निराजीपंताने बहादुरखानला दागदागिने व इतर भेटवस्तु दिल्या.

त्याने मोगलांबरोबर गुप्त करार केला की छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाहीच्या दक्षिणेतील प्रदेश जिंकण्यासाठी गेले असताना मोगलांनी स्वराज्यावर आक्रमण करु नये.

मोगलांचे स्वराज्यावरील आक्रमण थोपवणे आणि कुतुबशहाशी हात मिळवणी करत दक्षिण मोहीम यशस्वी करण्याच्या योजनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय मुस्तद्दीपणा, बुद्धीचातुर्य आणि परराष्ट्रनिती धोरण हे पैलू ठळकपणे जाणवतात.

शेवटी योग्य वेळ साधत दक्षिणेकडील राजकारण अनुकूल होताच स्वराज्याची पूर्ण व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी रायगडाहून कूच केले…

कमी कालावधीत सर्वात जास्त किल्ले आणि क्षेत्र जिंकून घेत स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या दक्षिण दिग्विजय मोहमेसाठी आजच्याच दिवशी ६ ऑक्टोबर १६७६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थान केले…

Leave a comment

0.0/5