Skip to content Skip to footer

स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकरची जोडी दिसणार छोट्या पडद्यावर

आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि ग्लॅमरस गर्ल अमृता खानविलकर हे दोघंही प्रथमच छोट्या पडद्यावर एकत्र येणार आहे. स्टार प्रवाहच्या ‘जिवलगा’ या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडेही दिसणार आहेत. स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघे अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. तर आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही’जिवलगा’मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडे सुद्धा या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येईल.

सुपरस्टार कलाकारांचा भरणा असलेल्या ‘जिवलगा’ या अत्यंत महत्वाकांक्षी अशा मालिकेच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांसमोर एक आगळी-वेगळी प्रेमकथा घेऊन येत आहे. ‘जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा…ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा…,’अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे. ‘स्टार प्रवाह’सारख्या नावाजलेल्या वाहिनीवर ही मालिका येतेय याचा मला विशेष आनंद आहे.’

‘जिवलगा’ ही एक खिळवून ठेवणारी प्रेमकथा आहे आणि प्रेक्षकांच्याही ती दीर्घकाळ लक्षात राहील. परस्परसंबंधांची ही कथा असून शेवटी जे योग्य त्याच्या बाजूने ती प्रवास करते. भाषिक दूरचित्रवाहिनीवर अशा प्रकारचे भव्यदिव्य पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ या माध्यमातून सुपरस्टार कलाकार आणि उत्तम कथा असे एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. ही एक उत्तम अशी कथा असून त्यात व्यक्तिरेखांची मानवी कड अनुभवायला मिळेल असे स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले. ‘स्टार प्रवाह’वरच्या इतर मालिकांप्रमाणेच ‘जिवलगा’ ही मालिकाही आपलं वेगळेपण नक्कीच अधोरेखित करेल, अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. या मालिकेत अनेक आघाडीचे, गुणी आणि लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झालीय. येत्या 8 एप्रिलपासून ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

. स्टार प्रवाहच्या ‘जिवलगा’ या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडेही दिसणार आहेत. स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघे अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. तर आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही’जिवलगा’मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडे सुद्धा या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येईल.

सुपरस्टार कलाकारांचा भरणा असलेल्या ‘जिवलगा’ या अत्यंत महत्वाकांक्षी अशा मालिकेच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांसमोर एक आगळी-वेगळी प्रेमकथा घेऊन येत आहे. ‘जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा…ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा…,’अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे. ‘स्टार प्रवाह’सारख्या नावाजलेल्या वाहिनीवर ही मालिका येतेय याचा मला विशेष आनंद आहे.’

‘जिवलगा’ ही एक खिळवून ठेवणारी प्रेमकथा आहे आणि प्रेक्षकांच्याही ती दीर्घकाळ लक्षात राहील. परस्परसंबंधांची ही कथा असून शेवटी जे योग्य त्याच्या बाजूने ती प्रवास करते. भाषिक दूरचित्रवाहिनीवर अशा प्रकारचे भव्यदिव्य पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ या माध्यमातून सुपरस्टार कलाकार आणि उत्तम कथा असे एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. ही एक उत्तम अशी कथा असून त्यात व्यक्तिरेखांची मानवी कड अनुभवायला मिळेल असे स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले. ‘स्टार प्रवाह’वरच्या इतर मालिकांप्रमाणेच ‘जिवलगा’ ही मालिकाही आपलं वेगळेपण नक्कीच अधोरेखित करेल, अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. या मालिकेत अनेक आघाडीचे, गुणी आणि लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झालीय. येत्या 8 एप्रिलपासून ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Leave a comment

0.0/5