Skip to content Skip to footer

अमेय घोले यांच्या मार्फत विभागात स्व-तपासणी किटचे वाटप.

अमेय घोले यांच्या मार्फत विभागात स्व-तपासणी किटचे वाटप.

सध्या देशात तसेच राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात मुंबई सारख्या दाटीवाटीच्या शहरात रोजच रुग्णांच्या संख्येमध्ये भर पडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य समिती अध्यक्ष तथा नगरसेवक अमेय घोले यांच्या मार्फत वडाळा गावातील प्रत्येक मंडळ यांना स्व – तपासणी किटचे वाटप करण्यात आले आहे.

अमेय-घोले-यांच्या-मार्फत-Through Ameya-Ghole

या किटमध्ये थर्मल थर्मोमीटर, SpO2 Pulse Oximeter, पीपीइ किट तसेच सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे. हे देण्यामागील उद्देश इतकाच की, त्या-त्या मंडळाचे कार्यकर्ते आपल्या विभागातील नागरिकांची स्वयं-तपासणी करून नागरिकांच्या आरोग्याची खबरदारी घेऊ शकतात. या माध्यमातून येत्या 4 दिवसात 15000 नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती अमेय घोले यांनी दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5