Skip to content Skip to footer

आज डॉक्टरांचा देशव्यापी संप, संप करण्याचे कारण काय?

आज डॉक्टरांचा देशव्यापी संप, संप करण्याचे कारण काय?

जर आपण आज वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा विचार करत असाल किंवा आपण डॉक्टरांची आजच्या तारखेची अपॉइंटमेंट घेतली असेल तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी, आज डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे आपल्याला पुढची तारीख घावी लागणार आहे. कारण इंडियन मेडिकल असोशिएशनने या संपाची घोषणा केली आहे.

हा संप सकाळी ६:०० वाजल्यापासून ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात सर्व गैरकोव्हिड आणि गैरआपत्कालीन सेवा ठप्प राहणार आहेत. शिवाय ओपीडीही बंद ठेवण्याचं आवाहन इंडियन मेडिकल असोशिएशन कडून करण्यात आले आहे.

सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संस्थेने एक नोटिफिकेशन काढले आहे. या नोटिफिकेशनमध्ये आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यास शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली गेली. नोटिफिकेशनमध्ये ५८ प्रकारच्या शस्रक्रियांची परवानगी दिली गेली आहे.

या नोटिफिकेशन मध्ये साध्या शस्त्रक्रियांशिवाय मेंदूच्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे. यालाच इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. आयएमए च्या म्हणण्यानुसार ही मिक्सोपॅथी असून यामुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात येईल, त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5