Skip to content Skip to footer

#MeToo – गुगलने केली ४८ कर्मचाऱ्यांची सुट्टी- सुंदर पिचाई

सध्या खूपच चर्चेत असलेल्या #MeToo अभियानात गुगल या जगप्रसिद्ध कंपनीने गेल्या दोन वर्षात त्यांच्या १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४८ कर्मचार्यांना लैंगिक शोषण प्रकरणात घराची वाट दाखविली असल्याचे कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुरुवारी जाहीर केले आहे. या संदर्भात पिचाई यांनी गुगलच्या सर्व स्टाफला एक इमेल केले असून त्यात लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या ४८ जणांना काढून टाकण्यात आल्याचे आणि कुणालाही एक्झिट पॅकेज दिले गेले नसल्याचा खुलासा केला आहे.

पिचाई या इमेल मध्ये म्हणतात गेल्या काही वर्षात कंपनीने अनेक सकारात्मक बदल केले आहेत. त्यात चुकीचे वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाईचाही समावेश आहे. सुरक्षित वर्क प्लेस उपलब्ध करून देण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत. लैंगिक शोषण संदर्भात कोणतीही तक्रार आली कि त्याची दखल त्वरित घेतली जाते आणि तपासानंतर कारवाई केली जाते.

न्यूयॉर्क टाईम्सने गुगलने त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि अँड्राईडचे निर्माते अँडी रुबिन याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यावर त्यांना पाठीशी घालून ९ कोटी डॉलर्सचे एक्झिट पॅकेज दिले असल्याचा दावा केला होता तो चुकीचा आहे असेही गुगलने स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5