Skip to content Skip to footer

माझा देव म्हणजे जनताच:आदित्य ठाकरे

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याची सुरुवात नुकतीच पाचोऱ्यातून झाली. यावेळी जमलेला जनसमुदायाला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी “जिथे जिथे त्रास असेल तिथे तिथे मदतीचा हात घेऊन जा आणि मदत करा’ हीच शिवसेनेची विचारधारा आहे असा कानमंत्र दिला. शिवसेना हा सरकारमध्ये राहूनही शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणारा एकमेव पक्ष आहे असंही ते म्हणाले. ही यात्रा प्रचारयात्रा किंवा मतं मागण्यासाठी नसून माझ्यासाठी ही यात्रा तीर्थयात्रेप्रमाणे आहे असं आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

गेली नऊ वर्षे अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, पण खरी ताकद ही जनताजनार्दनामध्ये असते,माझा देव म्हणजे तुम्ही सगळे आहेत आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला मी निघालो आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांची मनं जिंकली. शिवसैनिक म्हणून एकत्र होऊन महाराष्ट्र जिंकण्याची हीच वेळ आहे, कुठलाही तालुका,जिल्हा,प्रांत,जात-पात विसरा आणि जात गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना म्हणून एक व्हा. तुम्ही सगळे एकत्र आलात आणि ऊन जाऊन सावली आली, शिवसेनेची सावली तुमच्यावर पडली आहे. प्रत्येक शिवसैनिकांनी मनं जिंकण्याची तयारी करा कारण उद्या आपल्याला राज्य जिंकायचं आहे असं आवाहन शिवसैनिकांना करत आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

जनतेचे आभार मानायला मुहूर्ताची गरज नाही

ज्यांनी शिवसेनेला मतदान केलं आहे त्यांचे आपल्याला आभार मानायचे आहेत, ज्यांनी विरोधकांना मतं दिली असतील त्यांची आपल्याला मनं जिंकायची आहेत. महाराष्ट्रातील घरोघरी,गावागावात जाऊन आपण आपले ऋण व्यक्त करायचे आहेत. जर महाराष्ट्र घडवायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा शिवसैनिक झाला पाहिजे तरच आपण महाराष्ट्र घडवू शकतो आणि त्याची सुरुवात आपण आजपासून करतोय असं आदित्य ठाकरे शिवसैनिकांना संबोधून म्हणाले.

आदित्य ठाकरेंकडून उत्तर महाराष्ट्राचा सन्मान

Leave a comment

0.0/5