Skip to content Skip to footer

रो-रो सेवेला पहिल्याच दिवशी जनतेचा उत्तम प्रतिसाद…

रो-रो सेवेला पहिल्याच दिवशी जनतेचा उत्तम प्रतिसाद…

मुंबई ते मांडवा दरम्यान रो रो सेवा रविवारी सुरू करण्यात आल्यामुळे रस्तेमार्गाने मुंबई ते मांडवा जाण्यासाठी सध्या लागणारा तीन साडेतीन तासांचा कालावधी पाऊण ते एक तास झाला आहे. सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळले. मात्र, या सेवेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी या जहाजात ३५० प्रवाशी आणि २५ वाहने नेण्यात आली.

रो-रो सेवेसाठी ग्रीस येथून आणलेल्या जहाजाची चाचणी यशस्वी ठरली आहे. एकाचवेळी एक हजार प्रवासी आणि २०० कार वाहून नेण्याची क्षमता जहाजाची आहे. साधारण तिकिट २२० रुपये, एसीचे तिकीट ३३० रुपये तर लक्झरी क्लासचे तिकीट ५५० रुपये आहे. कारच्या आकारानुसार ११०० ते १९०० रुपये तिकीट आकारण्यात येईल. सध्या लोकांचा वाढत काळ पाहून येणाऱ्या दिवसात यांच्या संख्येत सुद्धा वाद करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5