वर्धा: परेडसाठी येत असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन उपनिरीक्षकासह ६ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. वर्धा-आर्वी मागावर असलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला. हे पोलिस वाहन आर्वीवरून पुलगाव-विरुळमार्गे वर्ध्याला येत होते त्यावेळेस हा अपघात झाला. जखमी ठाणेदारांसह अन्य जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.