Skip to content Skip to footer

मुंबईत कोरोनाची होणार रॅपिड टेस्टिंग

मुंबईत कोरोनाची होणार रॅपिड टेस्टिंग
राज्यात कोरोना संशयित आढळला तर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे येणाऱ्या रिपोर्टवर अवलंबून असते परंतु हा रिपोर्ट येण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने त्या रुग्णावर उपचारासाठी अधिक वेळ खर्ची होती. मुंबईत लवकरच रॅपिड टेस्टिंग होणार आहे. रॅपिड टेस्टसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला परवानगी दिली आहे.

आता मुंबई महापालिका दक्षिण कोरियामधून एक लाख किट्स विकत घेणार आहे. ते किट्स आले की रॅपिड टेस्टिंगला मुंबईत सुरुवात होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं आहे का याची तात्काळ माहिती मिळते. तसे इन्फेक्शन झाले असल्यास त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.

याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील यापूर्वीच माहिती दिली आहे. मुंबईत अनेक भाग मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात आले आहेत. ते भाग दाट लोकसंख्येचे आहेत. अशा ठिकाणी कोरोनाची तपासणी करण्यासाठीचे सॅम्पल घेणे, त्याचा अहवाल येणे यात वेळ जाऊ शकतो त्यामुळे या साथीवर नियंत्रण आणणे कठीण होईल म्हणून ही रॅपिड टेस्ट करावी, असा आग्रह राज्य सरकारने धरला होता. आम्ही या तपासण्या खाजगी लॅबच्या माध्यमातूनही करुन घेऊ शकतो, असे टोपे यांनी सांगितले होते

Leave a comment

0.0/5