Skip to content Skip to footer

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांचा मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांचा मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने अत्यंत योग्य पध्दतीने उपाय योजना केल्या जात आहेत, याबद्दल ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर परिषद प्रशासनाचे तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी राज्य प्रशासनाच्या निर्णयांचे पालन अंबरनाथ शहरात अतिशय कोटेकोर पध्दतीने राबवले जात असल्याबद्दल पोलिस प्रशासनाचे कौतुक केले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत यांसाठी निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

अंबरनाथ येथील अन्य राज्यातील गरीब, गरजू आणि बेसहारा नागरिकांसाठी गांधी विद्यालय येथे तयार करण्यात आलेल्या निवारा गृहाला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला तसेच आपुलकीने त्यांची विचारपूस केली. या निवारा गृहामध्ये या नागरिकांची राहण्याची सोय केली असून भोजन, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक वस्तू यांसोबत त्यांची वैद्यकीय तपासणी सुध्दा केली जात असून या व्यवस्थापनाची पाहणी यावेळी केली शिंदे यांनी केली.

Leave a comment

0.0/5