Skip to content Skip to footer

धारावी मध्ये उभारले गेले १९० खाटांचे सुसज्ज कोविड हेल्थ सेंटर – खासदार राहुल शेवाळे यांनी हेल्थ सेंटरच्या कामाचा घेतला आढावा

धारावी मध्ये उभारले गेले 190 खाटांचे सुसज्ज कोविड हेल्थ सेंटर – खासदार राहुल शेवाळे यांनी हेल्थ सेंटरच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई, ता. २९ : धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी, धारावीमध्ये १९० खाटांचे सुसज्ज असे ‘कोविड हेल्थ सेंटर’ उभारण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले हे हेल्थ सेंटर लवकरच कार्यन्वित होणार असून, यामुळे धारावीकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसोबत खासदार शेवाळे यांनी या हेल्थ सेंटरच्या कामाचा आढावा घेतला.

धारावी मध्ये उभारले गेले १९०-190 were erected in Dharavi

धारावीतील कोरोनाबाधितांना त्याच ठिकाणी सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धारावीतील निसर्ग उद्यानाजवळ १९० खाटांचे ‘कोविड हेल्थ सेंटर’ उभारण्यात आले आहे. याठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर यांसह सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. या सेंटरमुळे धारावीतील नागरिकांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे.

धारावीमध्ये आतापर्यंत १६०० हुन अधिक कोरोनाबाधित असले तरीही सुमारे ७०० रुग्ण बरे झाले असून, गेल्या काही दिवसांत मृत्यदरही घटला असल्याची माहिती खासदार शेवाळे यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5