Skip to content Skip to footer

शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे २३ जानेवारीला अनावरण

शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे २३ जानेवारीला अनावरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात येत आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी शनिवारी, २३ जानेवारी रोजी शिसवेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला बाळासाहेबांचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी विशेष आतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला.

Leave a comment

0.0/5