Skip to content Skip to footer

बीकेसीतील कोरोना रुग्णालय शाबूत! – बीएमसीने केला खुलासा.

बीकेसीतील कोरोना रुग्णालय शाबूत! – बीएमसीने केला खुलासा.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी बृहमुंबई महानगर पालिकेच्या वतीने १००० बेडचे जम्बो हॉस्पिटल कोरोनाग्रस्त रुग्णाच्या सेवेसाठी बीकेसीच्या मैदानात उभे केले आहे. मात्र काल मुंबईत धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने हॉस्पिटलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरवली गेली. मात्र काल आलेल्या वादळात या हॉस्पिटलचे कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी माहिती महानगर पालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून देण्यात आली आहे.

याविषयी मुंबई महापालिकेने ट्विटर हॅण्डलवर रुग्णालयाचे फोटो शेअर करुन खुलासा केला आहे. “निसर्ग चक्रीवादळामुळे बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाला मोठा फटका बसल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. त्या खोट्या आहेत असून, वादळामुळे रुग्णालयाच्या कुंपणाचं फक्त थोडं नुकसान झालेलं आहे. रुग्णालय व्यवस्थित असून, सायंकाळपासून पुन्हा सुरू करता येऊ शकते,” असे बीएमसीने म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5