मागच्या मुंबई मनपा निवडणुकीत भाजपच्या जागा का वाढल्या ? पाटील म्हणतात की

मागच्या मुंबई मनपा निवडणुकीत भा-In the last Mumbai Municipal Corporation election, Bha
ads

मागच्या मुंबई मनपा निवडणुकीत भाजपच्या जागा का वाढल्या ? पाटील म्हणतात की

मुंबई महानगर पालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र बसून योग्यवेळी निर्णय घेतील असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी बोलून दाखविले. आघाडी सरकारमध्ये आम्ही एकत्र असल्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढू शकतो, असेही जयंत पाटील यावेळी बोलून दाखविले होते.

भाजपचे स्थान मुंबईतील कमी होत आहे, असा दावा सुद्धा पाटील यांनी यावेळी केला. गेल्या वेळी शिवसेनेबरोबर आमची लढाई आहे असे दाखवून भाजपने त्यांची संख्या वाढवली. आता मुंबईकर भाजपला पाठिंबा देणार नाहीत. ती भीती असल्याने ते आपल्या पक्षाचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

सरकारच्या विविध विभागांना दिल्या जाणाऱ्या निधीवाटपाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, निधी वाटपात कोणाकडे दुर्लक्ष होते, असे मला वाटत नाही. निधीच कमी आहे. करोनामुळे तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे काही मर्यादा आहेत. ते सगळ्यांना माहीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडील खात्यांना निधीची आवश्यकता आहे. पण आपले उत्पन्न मर्यादित आहे. साडे बारा हजार कोटी आपण वेतनावर खर्च करतो. राज्याच्या तिजोरीत जो महसूल गोळा होतो, तो दर महिन्याला वितरित करताना अत्यंत आवश्यकता असेल तिथे दिला जातो, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here