Skip to content Skip to footer

समुद्राच्या भरतीमुळे मुंबईत आणखी पाणी तुंबणार…

समुद्राच्या भरतीमुळे मुंबईत आणखी पाणी तुंबणार…

काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली. भारतीय हवामान विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.

सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती समुद्रात असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील सर्व २४ विभाग कार्यालयासह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान शुक्रवारी मुंबईत झालेल्या पावसाने ३८ ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा खोळंबा झाला. अंधेरी सबवे आणि किंग्ज सर्कल भागात तुलनेने जास्त पाणी होते.

Leave a comment

0.0/5