मंडणगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानाची आमदार कदम यांनी अधिकऱ्यांसोबत केली पाहणी.
मंडणगड शहरातील मुख्य रस्त्यावरील सर्व खोके धारक व अधिकाऱ्यांसमवेत रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी आज आमदार योगेश कदम यांनी केली आहे. या दरम्यान रस्त्यांच्या बाजुंनी दुकानांचे होणारे नुकसान किती प्रमाणावर आहे याची पाहणी त्यांनी केली यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
जो पर्यंत दुकानदारांना न्याय मिळत नाही किंवा त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन होत नाही तो पर्यंत सदरची दुकाने न हलवण्याच्या सूचना यावेळी आमदार कदम यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गेले ४० वर्षे हे दुकानदार या ठिकाणी व्यवसाय करत असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असे अश्वासन आमदार कदम यांनी दुकानदारांना दिले होते.