Skip to content Skip to footer

‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’च्या माध्यमातून साजरा होणार माननीय मुख्यमंत्र्यांचा जन्मदिन – खासदार राहुल शेवाळे

‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’च्या माध्यमातून साजरा होणार माननीय मुख्यमंत्र्यांचा जन्मदिन – खासदार राहुल शेवाळे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनी (म्हणजेच २७ जुलै रोजी) दरवर्षी राज्यभरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’ राबवून, दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा जन्मदिन साजरा करण्यात येणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे झालेले मुंबईकर प्लाझ्मा दान करणार असून, याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.

कोरोनावर अद्यापही प्रभावी लस विकसित झालेली नाही. मात्र, कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्माचा (रक्तद्रव) वापर कोरोनावरील उपचारासाठी यशस्वीरीत्या केला जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या यात असलेली मोठी तफावत कमी करण्याच्या उद्देशाने ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’ आयोजित करण्याचा निर्णय खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या अभियानाची सुरुवात धारावी येथून केली जाणार आहे. कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे झालेले धारावीतील नागरिक, डॉक्टर्स, पोलीस आणि पदाधिकारी पहिल्या दिवशी प्लाझ्मादान करतील. त्यानंतर आठवडाभरात दादर- माहीम, वडाळा, सायन-कोळीवाडा, चेंबूर, अनुशक्तीनगर या दक्षिण- मध्य मुंबईतील व इतर विधानसभा क्षेत्रात हे अभियान प्रभावीरित्या राबविले जाणार आहे. तसेच या दरम्यान, प्लाझ्मा दाना बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे

Leave a comment

0.0/5