कोविड आरोग्य केंद्र व स्वॅब टेस्टिंग सेंटरचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण..

कोविड-आरोग्य-केंद्र-व-स्व-Kovid-health-center-and-self

कोविड आरोग्य केंद्र व स्वॅब टेस्टिंग सेंटरचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण..

मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना मात्र पनवेल, कल्याण, डोंबिवली या शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन डोंबिवली येथील पाटीदार भवन व आसरा फाऊंडेशन येथे उभारण्यात आलेल्या कोविड आरोग्य केंद्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी लकडवा पाटीदार समाजाच्या वतीने पाटीदार भवनाची प्रशस्त जागा ही महापालिकेच्या कोविड आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

या कोविड सेंटर मध्ये पहिल्या मजल्यावरील सुमारे ५००० स्क्वे.फुटच्या प्रशस्त जागेत ७० बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली असून, त्यातील ६० बेड्सना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असणार आहे तसेच १० सेमी आयसीयू बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे.

तसेच सदर हे रुग्णालय दर रुग्णालय वन रुपी क्लिनीकचे डॉ. प्रशांत घुले यांच्या मार्फत चालविण्यात येणार असून, २ एमडी फिजीशियन, २५ निवासी डॉक्टर ,५० परिचारिका आणि ३० हाऊसकिपींगचा स्टाफ इतके मनुष्यबळ रुग्णांच्या सेवेसाठी तैनात राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here