Skip to content Skip to footer

सलग दुसऱ्या दिवस उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी सेनेचे आंदोलन

सलग दुसऱ्या दिवस उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी सेनेचे आंदोलन

हाथरस येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यात उत्तरप्रदेश प्रशासानाने रात्रीच्या रात्र सदर मुलीवर अंत्यसंस्कार केल्यामुळे या प्रकरणात उत्तरप्रदेश मधील योगी सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात असल्याचा संशय व्यक्त होती आहे. याच पाश्वभूमीवर चर्चगेट स्थानकाच्या बाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.

याच पाश्वभूमीवर आज पुन्हा एकदा शिवसेनेतर्फे शिवाजी पार्क दादर येथे आंदोलन करण्यात आले. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी आंदोलन करत योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश प्रकरणाचा तपस करावा अशी विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे

Leave a comment

0.0/5