Skip to content Skip to footer

लालबागच्या राजा मंडळाचा कौतुकास्पद निर्णय, गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या खात्यात जमा करणार रक्कम….!

लालबागच्या राजा मंडळाचा कौतुकास्पद निर्णय, गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या खात्यात जमा करणार रक्कम….!

कोरोनाच्या संकटात मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांनी अत्यंत सध्या पद्धतीने यंदाचा सण साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर काही मंडळांनी यावेळी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातच आज लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय-चीन सीमेवर शाहिद झालेल्या एकूण २० जवानांच्या कुटुंबियांच्या खात्यात प्रत्येकी दोन लाख जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे.

तसेच आज संध्याकाळी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून हा गौरव सोहळा पार पडणार आहे. आजतागायत लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाने विविध समाजपयोगी कामे केली आहे. रक्तदान शिबीर , प्लाझ्मा दान शिबीर असे विविध उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जातात.

Leave a comment

0.0/5