Skip to content Skip to footer

अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी कंगनाच्या मुंबई येथील कार्यलायाला मनपाची नोटीस !

अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी कंगनाच्या मुंबई येथील कार्यलायाला मनपाची नोटीस !

सिने-अभिनेत्री कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आणि मुंबई शहर विरोधात केलेल्या वक्त्यव्यावरून तिच्या अडचणीत वाढ झालेली दिसून आली होती. त्यातच आता पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम प्रकरणी तिच्या पाली हिल स्थित मुंबईतील कार्यलायाला मनपाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एच पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कंगना रानौतला २४ तासाचा कालावधी दिला आहे. या कालावधीत तिने अनधिकृत बांधकामाबाबत स्पष्टीकरण द्यावे. नाही तर आम्ही त्याठिकाणी कारवाई करणार आहोत. तसेच कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यासाठी सोमवारी धाड टाकण्यात आली. ज्यानंतर समोर आलेली माहिती पाहता कार्यालयाची उभारणी करतेवेळी काही नियमांचं उल्लंघन केलं गेल्याचं म्हटलं जात आहे.

Leave a comment

0.0/5