Skip to content Skip to footer

शिवसेना माजी महापौर संजय मोरे कोरोना बाधीत.

शिवसेना माजी महापौर संजय मोरे कोरोना बाधीत.

ठाणे महानगर पालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना कोरोना रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळालेली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संकटात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मोरे हे जनसामान्यांच्या सेवेसाठी जागोजागी फिरताना दिसून आले होते. कोरोना रुग्णांना अगदी रुग्णवाहिका पासून ते कोरोना हॉस्पिटलमध्ये बेड मिळेपर्यंत संजय मोरे संबंधित खात्याकडे पाठपुरवठा करताना दिसून आले होते. आपल्या मतदारसंघात गरीब नागरिकांना धान्य वाटपा पासून ते अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटण्यापर्यंत त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.

मात्र जनतेची सेवा करताना कोरोना असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळेच मोरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यावर त्यांचे सहाय्यक मिहीर ठक्कर यांनी लवकरच होऊन ते जनतेच्या सेवेत दाखल होतील, असे बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5