Skip to content Skip to footer

पीएमपीएमएलच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासाची मुभा

सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. तसंच हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ज्येष्ठ नागरिकांना प्रवासास सरकारनं नकार दिला होता. परंतु आता पीएमपीएमएल बसेसमध्ये ६५ वर्षांवरील प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ३ सप्टेंबरपासून पुण्यात पीएमपीएमएलची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महामंडळाकडील एकूण १३ डेपोंच्या १९० मार्गांवर ४२१ बसेसचे संचालनाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रतिबंधीत क्षेत्र आणि मध्य भागातील पेठांचा भाग सोडून पीएमपीएमएलची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रवाशांची काळजी घेण्यासाठी या बसेसमध्ये सॅनिटाझेशन स्टँडही बसवण्यात आले आहेत. तसंच बसेसचंही योग्यरित्या सॅनिटायझेशनही करण्यात येतं.

शहरातील प्रमुख रस्ते उपनगर या ठिकाणावरील गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळ आणि सायंकाळी पीएमपीएमएलची शटल सेवा सुरू राहणार आहे.

Leave a comment

0.0/5