Skip to content Skip to footer

अर्णब गोस्वामीला पोलिसांशी घातलेली हुज्जत भोवणार, पोलिसांनी दाखल केला गुन्हा?


अर्णब गोस्वामीला पोलिसांशी घातलेली हुज्जत भोवणार, पोलिसांनी दाखल केला गुन्हा?

आर रिपब्लिक वृत्तवाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी काल अटक केली. बुधवारी पनवेल पोलीस त्यांच्या मुंबईमधील वरळीस्थित घरी पोहचले होते. यावेळी अर्णब गोस्वामी यांनी दीड तास पोलिसांशी हुज्जत घातली होती. त्यानंतर पोलिसांनी अर्णब यांना अटक केली होती.

मात्र पोलीस अटकेची कारवाई करत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत अधिक वाढ झालेली दिसून येत आहे.

आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानातून अटक करण्यात आली. पोलिसांकडे अर्णब यांच्या अटकेसाठी रितसर वॉरंट होते आणि त्यानुसारच पोलिसांनी कारवाई केली. मात्र, या कारवाईदरम्यान अर्णब यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना विरोध करण्यात आला. कारवाईवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळेच अर्णब यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a comment

0.0/5