प्रसिद्ध अभिनेता विजय राज यांना अटक.
कर्मचारी सदस्यांपैकी असलेल्या एका तरुणीची छेड काढल्या प्रकरणी विजय राज यांना अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
या टीम मधील सर्वांसाठी हॉटेल गेट वे येथे राहण्याची व्यवस्था असून, याठिकाणी राज यांनी या तरुणीची छेड काढल्याचे समोर आले होते. तसेच तरुणीने तक्रार दाखल करताच पोलिसांनी राज यांना अटक केली होती. परंतु जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला असून, १५ हजार रुपयांच्या जातमुचल्यावर त्यांची सुटका करण्यात आली.